अल्पसंख्यांक संस्थांनी नेहरू हायस्कूल सारख्या शाळा डिजिटल कराव्यात : अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान
schedule29 Apr 25 person by visibility 312 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कोल्हापूर येथे नव्याने डिजिटल पॅनेलबोर्डने सुसज्ज डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांच्या हस्ते करणेत आले. या प्रसंगी बोलताना प्यारे खान यांनी अल्पसंख्यांक शाळांनी आपला दर्जा वाढवावा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी मुस्लिम समाजाची उन्नती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी श्रीमती लालुबाई मकबूल ताशिलदार यांचा सत्कार प्यारे खान यांचे हस्ते करणेत आला. संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी आपल्या भाषणात कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांच्या संस्कारांनी सुसंस्कृत असलेने कोणत्याही प्रकारच्या जातीय दंगली पासून मुस्लिम समाज दूर असल्याचे सांगितले. मुस्लिम बोर्डिंग ग्रंथालयाच्या माध्यमातून मुलीम सामाज्याती विद्यार्थ्यांबरोबरच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त केले असलेबाबतप्रतिपादन केले.हायस्कूल माधील सर्व वर्गखोल्या डिजिटल केल्या जाणार असल्याबाबत माहिती दिली.
संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेबद्दल व शाळेबद्दल माहिती दिली. शालेय समिती चेअरमन मा.रफिक शेख यांनी पाहुण्यांची ओळख करू दिली.संचालक रफिक मुल्ला यांनी आभार मानले.सूत्र संचालन जिलानी सर यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे संचालक हाजी जहांगीर अत्तार, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी,मलिक बागवान,हाजी लियाकत मुजावर,प्रा.सिकंदर डांगे,प्रा.डॉ.समी मुल्ला,प्रा.शौकत बोजगर,मा.राहीद खान,डॉ.इस्माईल नमाजी,मुख्याध्यापक श्री.ताशिलदार एम.विद्यार्थी,पालक,शिक्षक उपस्थित होते.