सरपंच आकाशी कांबळे यांचा आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार
schedule29 Apr 25 person by visibility 240 categoryसामाजिक

कोल्हापूर: हसुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आकाशी पोपट कांबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपसरपंच अभिजीत पाटील, ए. पी. पाटील सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र चौगुले, जिनाप्पा माणगावे सोसायटीचे चेअरमन अभय सुतार, रमेश चौगुले, सुरेश चौगुले,
आप्पासो चौगुले, सुरेंद्र भंडे, देवल कांबळे, अनिकेत पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य संख्येने उपस्थित होते.