कोल्हापूर महानगरपालिका : 6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु
schedule21 Jun 24 person by visibility 324 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिलाच्या रक्कमेतून 6 टक्के सवलत योजना जाहिर केली आहे. या सवलत योजनेचे काहीच दिवस शिल्लक राहिलेने महापालिकेच्यावतीने सुट्टी दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या मिळकतधारकांनी अद्यापही आपला घरफाळा भरणा केलेल नाही त्यांनी 30 जून अखेर तो भरुन या 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी महापालिकेची सुविधा केंद्रे शनिवार दि.22 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 3.30 पर्यंत, सोमवार ते शुक्रवार दि.24 ते 28 जून रोजी सकाळी 9 ते सायं 6 पर्यंत व शनिवार दि.29 व रविवार दि.30 जून 2024 रोजी सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंतय सुरु ठेवण्यात येणार आहे.
आतापर्यंत शहरातील आज अखेर 40,908 इतक्या मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन रु.16 कोटी 72 लाख इतकी रक्कम जमा केली आहे. ज्या मिळकधारकांना अद्यापही पोस्टा मार्फत बिल मिळाले नसलेस त्यांनी जवळच्या विभागीय कार्यालयात जाऊन दुबार बिलाची प्रत प्राप्त करुन घेऊ शकतात तसेच, कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात जावून आपला करदाता क्रमांक सांगून चालू वर्षाची रक्कम भरुन 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घेता येईल.
तसेच, गुगल पे, फोन पे, पेटीएम व महापालिका वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने कराचा भरणा करता येईल. तरी या 6 टक्के सवलत योजनेचा जास्तीत जास्त मिळकतधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.