SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिरोळ तालुक्यातील जैनापूर परिसरात 28.40 लाखांची अनधिकृत खते जप्तडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या 12 विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवडपोलीस तपासावरील व कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेजादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगेस्त्री शक्ती दुर्लक्षित करता येणार नाही : खा. छ. शाहू महाराज2 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीरNCC मुले ही विविध राज्यांचे सांस्कृतिक दूत ; ब्रिगेडियर आर के पैठणकरविद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजविण्याबाबत राज्यभर शाळांमध्ये विविध उपक्रमनिवडणूक प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडा : जिल्हाधिकारीशिरसंगी येथील पर्यावरणीय वारसा लाभलेल्या वटवृक्षास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट

जाहिरात

 

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या 12 विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड

schedule28 Nov 25 person by visibility 48 categoryशैक्षणिक

तळसंदे : डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठच्या बी. टेक. एग्री. च्या अंतिम वर्षाच्या १२  विद्यार्थ्यांची निवड ‘क्रॉप क्रेझ अ‍ॅग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रतिष्ठित कंपनीमध्ये निवड झाली आहे. 

क्रॉप क्रेझ अ‍ॅग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही पुणे स्थित कंपनी असून अत्याधुनिक उपायांसह शेतीला सक्षम बनवन्यायासाठी कार्यरत आहे.उच्च दर्जाचे कृषी उत्पादन विक्री,  शाश्वत वाढीसाठी तज्ञ सल्लागार सेवा कंपनीद्वारे पुरवली जाते. या कंपनीच्यावतीने विद्यापीठात कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन पात्र विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. त्यातून 12 विद्यार्थ्यांची कंपनी अधिकाऱ्याकडून निवड करण्यात आली. 

यामध्ये प्रणील पाटील, संकेत जाधव, साहिल मगदूम, आदित्य काटे, अभिजीत पाटील, संदेश सरगर, ओंकार पाटील, व्यंकटेश मोहिते, सुयश पाटील, स्नेहा चव्हाण, तन्वी पाटोळे, श्रद्धा पाटील यांची निवड झाली आहे. प्लेसमेंट ऑफिसर प्रदीप पाटील व स्वराज पाटील, विभाग प्रमुख मंगल पाटील, विभाग समन्वयक अमोल घाडगे यांचे या विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, आधुनिक कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून आमच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’सारख्या नावाजलेल्या अॅग्री-टेक कंपनीमध्ये झालेली निवड ही त्यांच्या कौशल्याची मोठी पावती आहे. संशोधनाधारित आणि प्रयोगाधारीत शिक्षणामुळे विद्यार्थ्याना कृषी क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध होत  आहेत. त्यांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्याचे कुलपती डॉ.संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता,  कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes