संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचा उन्हाळी परीक्षा निकाल उच्चंकित
schedule08 Jul 25 person by visibility 131 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागात शै. वर्ष २०२४-२०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
डिप्लोमा इन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी या कोर्सचा निकाल १००% लागला असून टॉपर्समध्ये प्रथम क्रमांक कोळेकर प्रतीक प्रकाश ७५.३३% आणि द्वितीय क्रमांक राठोड सुभाष तिप्पण्णा ७३.८६% यांनी पटकावला., डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग
या कोर्सचा निकालही १००% लागला आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक सांगळे प्रणाली पांडुरंग ७८.५६% तर द्वितीय क्रमांक शिंदे श्रद्धा राहुल ७५.३३% यांनी मिळवला.,ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी या कोर्समचा निकाल ७६.३१% लागला असून प्रथम क्रमांक कांबरे प्रशांत भुजेंद्र ८२.००%, द्वितीय क्रमांक पिंगळे ऋतुराज शंकर ७६.३३% आणि तृतीय क्रमांक कोपर्डेकर दिग्विजय एकनाथ ७५.८३% यांनी मिळवला. अशी माहिती प्रसारमाध्यमांना डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी दिली आहे.
या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जात असून या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी केले आहे.
इन्स्टिट्यूटच्या या विभागाच्या यशस्वी निकालाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.