SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरी

schedule16 May 26 person by visibility 407 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमधील इटीसी विभागातील विद्यार्थी आदित्य चंदगडे, प्रथमेश मांगलेकर, गिरीश अडते, सौरभ आवळे या विद्यार्थ्यांनी डॉ एस.आर. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली विकसीत केलेल्या डिजीटल ड्रायव्हींग टेस्ट सिस्टीम फॉर आरटीओ या अभिनव डिजीटल ड्रायव्हिंग टेस्ट सिस्टीमची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे. गुरुग्राम (हरियाणा) येथील श्री गुरु गोबिंद सिंग ट्रायसेंटेनरी विद्यापीठात आयोजित इन्व्होवेशन, डिझाईन अ‍ॅण्ड इंटरप्रेनरशिप आयडीई बूटकॅम्पमध्ये या प्रकल्पाचे विशेष कौतुक करण्यात आले.


एआयसीटीई आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलतर्फे आयोजित या बूटकॅम्पमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नाविण्यपूर्ण आणि समाजउपयोगी संकल्पनेद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आरटीओ मधील वाहन चालविण्याच्या चाचणी प्रक्रियेत होणारा मानवी हस्तक्षेप, पक्षपात आणि त्रुटी कमी करण्याच्या उददेशाने ही सेन्सर अधारित स्वयंचलित प्रणाली तयार करण्यात आली आहे.

याप्रणालीच्या माध्यमातून वाहनचालकांच्या चाचणीचे अचूक आणि पारदर्शक मूल्यमापन केले जाते. बाउंड्री व्हायलेशन तसेच फूट डाउन यासारख्या चूका सेन्सरच्या सहायाने तत्काळ ओळखल्या जातात. चाचणीचा निकाल त्वरीत प्रक्रियेत आणून ब्लिंक क्लाउड वर सुरक्षितपणे संग्रहित केला जातो. त्यामुळे माहितीमध्ये फेरफार होण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट होते. देशात ३० टक्के वाहन परवाने अयोग्य पध्दतीने दिले जात असल्याने रस्ते अपघांताचे प्रमाण वाढत असल्याची बाब विविध अहवालांतून समोर आली आहे. अशा परिस्थितीत ही प्रणाली वाहन परवाना प्रक्रियेत पारदर्शकता आणून रस्ते सुरक्षिततेला बळकटी देणारी ठरणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

या बूटकॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना शोधल्या, उदयोजकीय कौशल्यांचा सन्मान केला आणि समविचारी व्यक्तींशी विविध विषयांवर उहापोह करण्यात आला याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन करण्यास होणार असून या अभिनव प्रकल्पामुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता, संशोधन वृत्ती आणि नाविण्यपूर्ण विचारसरणी राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. डीकेटीई मध्ये उपलब्ध असलेली आयडिया लॅब, फाइव्हजी लॅब, इन्व्होवेश कटटा तसेच विविध अधुनिक लॅबमार्फत विद्यार्थ्यांना विविध संशोधनाचे मार्गदर्शन केले जाते यामुळे अशा स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना या लॅबमधील सुविंधाचा लाभ होतो व देशापातळीवरील या स्पर्धेत आपली गुणवत्ता त्यांनी सिध्द केली.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी विद्यार्थ्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ सौ.जयश्री खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes