SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महात्मा बसवेश्वर पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनएम .एड व बी .एड –एम .एड (एकात्मिक ) साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६बी.एस्सी.बी .एड् ((ITEP) साठी नॅशनल कॉमन एट्रन्स टेस्ट (NCTE) अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२६डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश एमपीएससी एग्रीकल्चरल मध्ये पल्लवी पाटील राज्यात आठवी डॉ. शरद बनसोडे यांची एआययू निरीक्षक म्हणून राष्ट्रीय विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदअतुल देऊळगावकर यांचे विद्यापीठात सोमवारी व्याख्यानछत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारलेराज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

जाहिरात

 

एमपीएससी एग्रीकल्चरल मध्ये पल्लवी पाटील राज्यात आठवी

schedule13 Feb 26 person by visibility 160 categoryशैक्षणिक

कोल्हापूर :  जिद्द चिकाटी सातत्यपूर्ण अभ्यास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोल्हापूर येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे निवृत्त शिक्षक  एस ए पाटी यांची सुवर्णकन्या कुमारी पल्लवी संपतराव पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक पटकावून नावलौकिक वाढविला आहे. या यशामुळे तिची राज्य शासनाच्या कृषी उपसंचालक या पदावर नुकतीच निवड झाली आहे आणि विशेष म्हणजे तिने हे यश पहिल्याच प्रयत्नामध्ये पूर्ण केला आहे .

तिचे प्राथमिक शिक्षण राजर्षी छत्रपती शाहू विद्यालय न्यू पॅलेस येथे झाले आहे. तसेच इयत्ता अकरावी बारावी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे झाले असून बीएससी एग्रीकल्चर कॉलेज हे शिक्षण डी वाय पाटील कॉलेज तळसंदे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षण एग्रीकल्चर एम एस सी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पूर्ण झाले आणि तेथेच तिने आपण या क्षेत्रामधील नामवंत अधिकारी होण्याचे ठरविले त्याप्रमाणे तिने या परीक्षेमध्ये यश मिळवून ऍग्रीकल्चर क्लास वन अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. 

या उज्वल यशामध्ये कुटुंबातील आई-वडील भाऊ तसेच सर्व शिक्षक व मित्रपरिवार यांचा मोठा वाटा आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes