दुचाकी, चारचाकी वाहने चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, 7 चारचाकी, 5 दुचाकी मोटर सायकली जप्त
schedule08 Jan 25 person by visibility 294 categoryगुन्हे
कोल्हापूर : दुचाकी व चारचाकी गाड्या चोरणारी 05 जणांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 60,00,000/- रूपये किंमतीच्या 7 चारचाकी व 5 दुचाकी मोटर सायकली जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर शाखेने केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राम कोळी व सुरेश पाटील यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी नागेश शिंदे, रा. कोरोची, हातकणंगले हा चोरीतील अशोक लेलँन्ड टेंम्पो घेवून दि. 06.01.2025 रोजी शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी जाणारे रोडवर जलसंपदा कार्यालयाचे गेटजवळ येणार आहे.
मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि. 06.01.2025 रोजी सापळा लावून आरोपी 01) नागेश हनमंत शिंदे, वय30, रा. लोकमान्यनगर कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यास व त्याचा साथीदार 02) संतोष बाबासो देटके, वय 40, रा. तारळे, ता. पाटण, जि. सातारा यांना अशोक लेलॅन्ड कंपनीचे पिकअप मालवाहतूक टेंम्पोसह ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे कब्जात मिळाले मालवाहतूक टेंम्पो हा चोरीचा असून सदर बाबत शिरोली MIDC पोलीस ठाणे, गु.र.नं. 341/2024, भा. न्या. सं.-303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असलेची माहिती मिळाली. म्हणून त्यांना गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले.
आरोपी नागेश हनमंत शिंदे हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असलेने त्यांचेकडे कौशल्यपुर्ण अधिक तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्यासह एकूण 05 मोटर सायकल चोरीचे व 06 चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे केलेची माहिती सांगितली. आरोपी नागेश शिंदे याचे माहितीने आणखीन 05 चोरीच्या मोटर सायकली जप्त केल्या. तसेच त्यांचे साथीदार 03) मुस्तफा सुपे महंमद, वय 50, रा. सेकंड क्रॉस, जनता कॉलनी, ता. दुमकूर, जि. बेंगलोर, राज्य कर्नाटक, मुबारक खय्युमशहा खादरी, वय 54 व 04) करीम शरीफ शेख, वय 64, दोघे रा.पी एच कॉलनी, दुमकूर ता.जि. दुमकूर, राज्य कर्नाटक यांना बेंगलोर, राज्य-कर्नाटक येथून ताब्यात घेवून त्यांचेकडे एकत्रीतरित्या तपास करून नमुद आरोपीकडून चोरीचे 02 अशोक लेलंड दोस्त टेंम्पो, 02 मारुती सुझुकी कंपनीच्या इको, 01 बोलेरो पिकअप व 01 युंडाई वेरणा गाडी अशा एकूण 06 चारचाकी गाडया जप्त केल्या आहेत. तसेच नमुद तपास पथकाने दि. 08.01.2025 रोजी पुणे-बेंगलोर हायवे रोडवर लक्ष्मीटेकडी, कागल या ठिकाणी सापळा लावून आरोपी 05) इमामसाब रसुलसाब मुलनवार, वय 45, रा. कुरटपेटी बेटगिरी ता. जि. गदग, राज्य कर्नाटक यास ताब्यात घेवून त्याचे कब्जातून 01 अशोक लेलंड कंपनीचा चोरीचा टेंम्पो जप्त केला आहे. वरील सर्व आरोपीकडून एकूण चोरीची 07 चारचाकी वाहने व 05 मोटर सायकली असा एकूण 60,00,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरील आरोपी पैकी नागेश हनमंत शिंदे याचे विरुध्द यापुर्वी दुचाकी व चारचाकीचे 90 गुन्हे, संतोष बाबासो देटके याचे विरुध्द चारचाकी वाहन चोरीचे 06 गुन्हे व करीम शरीफ शेख याचे विरुध्द चोरीची वाहने विकत घेतलेबाबतचे 04 गुन्हे दाखल आहेत.
नमुद आरोपीकडून शिरोली MIDC पोलीस ठाणे, गु.र.नं.341/2024, भा. न्या. सं.-303 (2) प्रमाणे दाखल गुन्साचे तपासात वरील वाहने जप्त केली असून सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अतिश म्हेत्रे तसेच पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, महेश खोत, रुपेश माने, रोहीत मर्दाने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सर्जे, संजय कुंभार, सुशिल पाटील, राजेंद्र वरंडेकर तसेच सायबर पोलीस ठाणेकडील सचिन बेंडखेळे, सुरेश बाबर व महिला पोलीस अमंलदार मिनाक्षी पाटील यांनी केली आहे.