SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
“युवकांनो...ड्रग्स मुक्त समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..!” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आरोग्य, नेत्र तपासणी शिबीराचे आयोजनआपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळेमुळे अपघात विरहित जीवन जगण्यास मदत ; प्राचार्य महेश आवटेगारगोटी येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शनिवारी उद्घाटनअरविंद देशपांडे यांचे ‘लेखक व विद्यार्थी वाचन संवाद’ उपक्रमांतर्गत विद्यापीठात व्याख्यानकोल्हापूर महानगरपालिका : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या 11 व्यापाऱ्यांकडून 90 हजार रुपये दंड वसूलदुचाकी, चारचाकी वाहने चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, 7 चारचाकी, 5 दुचाकी मोटर सायकली जप्तसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्रीच्या विद्यार्थ्यांचे "नव संकल्पपित तंत्रज्ञान प्रकल्पांचे” सादरीकरणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठ आणि "सिद्धांता नॉलेज फाउंडेशनची संयुक्त बैठकविभागांनी 100 दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुढील 100 दिवसांच्या नियोजनाचा घेतला आढावा

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या 11 व्यापाऱ्यांकडून 90 हजार रुपये दंड वसूल

schedule08 Jan 25 person by visibility 390 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहिम राबविण्यात येत आहे. बुधवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने लक्ष्मीपुरी, लुगडी ओळ व सासणे ग्राउंड परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी करण्यात आली. 

यावेळी लुगडी ओळ येथील लक्ष्मी नारायण स्वीट मार्ट, खत्री पेढेवाले, लक्ष्मीपूरी येथील महालक्ष्मी ट्रेडर्स, श्री प्लॅस्टिक, अमृत ट्रेडर्स, पटेल ट्रेडर्स, निरंकारी ट्रेडर्स, साई स्टेटस, दत्त ट्रेडर्स पूजा प्लॅस्टिक व सासने मैदान येथील अजय ट्रेडर्स या व्यापाऱ्याकडे तपासणी दरम्यान प्लॅस्टीकचा साठा आढळून आला. यामध्ये लक्ष्मी नारायण स्वीट मार्ट, खत्री पेढेवाले, महालक्ष्मी ट्रेडर्स व अजर ट्रेडर्स यांना प्रत्येकी 5 हजार रुपये व श्री प्लॅस्टिक, अमृत ट्रेडर्स, पटेल ट्रेडर्स, निरंकारी ट्रेडर्स, साई स्टेटस, दत्त ट्रेडर्स, पूजा प्लॅस्टिक यांना प्रत्येकी 10 हजार दंड करुन या पथकाने 11 व्यापाऱ्यांकडून रु.90 हजार इतका दंड करुन तो वसूल केला.

 ही कारवाई सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, सहाय्यक आरोग्य निरीक्षक गीता लखन, आरोग्य निरीक्षक माधवी मसुरकर, शुभांगी पवार, सुशांत कांबळे, विकास भोसले, नंदकुमार कांबळे मुकादम व कर्मचारी यांनी केली.

 तरी महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व आस्थापना, व्यापारी व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes