प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आरोग्य, नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
schedule08 Jan 25 person by visibility 172 categoryसामाजिक
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर, जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील वाहन चालकांचे आरोग्य व नेत्र तपासणी तसेच रस्ते सुरक्षेबाबत प्रबोधन शिबीर दि. 9 व 10 जानेवारी 2025 रोजी सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबीरामध्ये जिल्ह्यातील बस चालक, रिक्षा चालक व ट्रक चालक यांची निःशुल्क आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार असून या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
भारतात रस्ते अपघात ही गंभीर समस्या असून यामध्ये दरवर्षी जवळपास 1.60 लाख व्यक्ती आपला जीव गमावतात. भारतातील रस्ते अपघातांचे विश्लेषन केले असता, बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे.