SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
काळाची क्रूर थट्टा! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांची गाडी विहिरीत; ९ जणांचा दुर्दैवी अंतमोदींची १२ वर्षे म्हणजे राष्ट्रउभारणीचे महातप; भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : शिवप्रकाशजीकोल्हापूर महानगरपालिका 'पथकर' आकारण्याच्या निर्णयावर उत्तम पाटील यांची नाराजीठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्तप्रलंबित बिलांमुळे ठेकेदार आर्थिक संकटात; राज्यभर एकाच वेळी आंदोलनाचा इशाराडी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया; ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’च्या सहकार्याने उपक्रम एमपीएससी परीक्षा: कोल्हापुरात चोख बंदोबस्तात परीक्षा पारगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड'गोकुळ' मार्फत डॉ.योगेश गोडबोले यांचा सत्कारअमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीचा चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आढावा

जाहिरात

 

काळाची क्रूर थट्टा! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांची गाडी विहिरीत; ९ जणांचा दुर्दैवी अंत

schedule14 Jun 26 person by visibility 136 categoryगुन्हे

सोलापूर : देवदर्शन करून आनंदाने घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथांचे दर्शन घेऊन पिकअप वाहनाने आपल्या गावी परतत होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास हे वाहन म्हसवड-तांदुळवाडी रस्त्यावरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, ही गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते, तरीही युद्धपातळीवर प्रयत्न करून ९ भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघातात काही जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे रांजणी गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes