अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. देवेंद्र रासकर यांची सलग सातव्यांदा निवड
schedule06 Jun 26 person by visibility 163 categoryसामाजिक
कोल्हापूर : अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. देवेंद्र रासकर यांची सलग सातव्यांदा निवड करण्यात आली आहे. दर तीन वर्षांनी होणाऱ्या या निवड प्रक्रियेत, आपल्या कार्यावर असलेल्या विश्वासामुळे डॉ. रासकर यांच्यावर संघटनेने पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली आहे.
गेल्या अठरा वर्षांपासून डॉ. रासकर हे अत्यंत निष्ठेने आणि ध्येयाने जिल्हाध्यक्षपद भूषवत आहेत. या निवडीनिमित्त सत्कार समारंभात महाराष्ट्रातील आघाडीचे दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महादेव साळोखे यांच्या हस्ते डॉ. देवेंद्र रासकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक शिवाजीराव पटवणे उपस्थित होते.
तसेच, रंकाळा प्रेमी मंच, कोल्हापूरच्या वतीने देखील डॉ. रासकर यांच्या या सातत्यपूर्ण यशाबद्दल आणि त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. गेल्या दोन दशकांपासून कोल्हापूरच्या सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात डॉ. रासकर यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. यावेळी रंकाळा प्रेमी मंचचे सदस्य आदी उपस्थित होते.