SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : मित्रानेच केला विश्वासघात; बहिरेश्वरमधील चोरीचा २४ तासांत छडाअखिल भारतीय हिंदू महासभेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. देवेंद्र रासकर यांची सलग सातव्यांदा निवडमान्सून काळात प्रशासनाने सज्ज राहावे; प्रशासनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचनापुणे पदवीधर पुरवणी मतदार नोंदणीत कोल्हापूर पिछाडीवर; पदवीधरांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्याचे माणिक पाटील-चुयेकर यांचे आवाहनस्वराज्यगुढी: छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेकनिसर्गाची हिरवी छत्री: 'जागतिक हरित छप्पर दिन'पी. एम. सूर्यघर योजनेत केडीसीसी बँकेसह कागल तालुका देशात एक नंबर आणूया; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन नीट परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशकोल्हापूरला पर्यटनाच्या अनुषंगाने देश पातळीवर आणणार : मंत्री शंभूराज देसाईलोकनेते देसाई अध्यासनाला निधीची कमतरता भासू देणार नाही : मंत्री शंभूराज देसाई

जाहिरात

 

कोल्हापूर : मित्रानेच केला विश्वासघात; बहिरेश्वरमधील चोरीचा २४ तासांत छडा

schedule06 Jun 26 person by visibility 203 categoryगुन्हे

कोल्हापूर : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील एका घरात झालेली चोरी अवघ्या २४ तासांत करवीर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही चोरी खुद्द फिर्यादीच्या मित्रानेच केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ४४ हजार २५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

३ जून २०२६ रोजी संभाजी शिवाजी काशीद हे आपल्या कुटुंबासह भात पेरणीसाठी शेतात गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला आणि तिजोरीतील दागिने लंपास केले. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार सोमराज पाटील आणि प्रकाश कांबळे यांना बातमी मिळाली की, हा गुन्हा फिर्यादीचा मित्र वैभव विश्वास पडवळे (वय २९, रा. बहिरेश्वर) याने केला आहे आणि तो चोरीचा ऐवज विकण्यासाठी खुपिरे फाटा येथे येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून वैभव पडवळे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे सोन्याचे झुबे, कानातील वेल आणि चांदीचे पैंजण असा एकूण १,४४,२५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र कळमकर व गुन्हे शोध पथकातील टीमने केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes