SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजीचे सुपुत्र आयएएस डॉ. किरण पाटील यांचा राज्य शासनाकडून विशेष गौरव‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहातनेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एच.एस.सी. परीक्षा विज्ञानशाखेचा निकाल ९४ टक्के टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी; प्रथम सहभागातच राज्य विद्यापीठांत देशात दहावे स्थानमलकापुरात रक्ताचं नातं रक्ताळलं; क्षुल्लक वादातून सख्ख्या भावाचा काटा काढला; आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून काही तासांत बेड्याकृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकरकोल्हापूर: एसटी प्रवाशांचे दागिने लांबवणारी सराईत महिला जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून की जुना वाद? मलकापुरात मोठ्या भावाकडून सख्या भावाचा भीषण खूनमहापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरीशिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात

जाहिरात

 

इचलकरंजीचे सुपुत्र आयएएस डॉ. किरण पाटील यांचा राज्य शासनाकडून विशेष गौरव

schedule02 May 26 person by visibility 111 categoryसामाजिक

भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि इचलकरंजीचे सुपुत्र डॉ. किरण पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या मुख्य सचिवांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी राबविलेल्या 'सहज' प्रणाली आणि 'महसूल मित्र' या डिजिटल उपक्रमांची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे.

डॉ. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या तंत्रज्ञानामुळे जमिनीचे जुने नकाशे, सातबारा आणि विविध शासकीय कागदपत्रे आता नागरिकांना मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. महसूल मित्र या व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख झाले असून, नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत आहे. सध्या पशुसंवर्धन व दुग्धविकास आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. पाटील यांनी यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंत्रालयात उपसचिव म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या यशामुळे इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes