डॉ. बाबासाहेबांच्या कार्यास राजर्षी शाहू महाराजांचा भक्कम आधार, पाठींबा : डॉ. सुनीलकुमार सरनाईक
schedule14 Apr 25 person by visibility 344 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : "डॉ. बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या कार्यास राजर्षी शाहू महाराजांचा भक्कम आधार पाठींबा, तसेच सहकार्य होते व त्यामुळेच डॉ.बाबासाहेब यांचे मनोधैर्य वाढले" असे प्रतिपादन समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. सुनीलकुमार सरनाईक.यांनी केले.
रजपूतवाडी येथील भटका व विमुक्त समाज विकास मंडळ, संचलित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .सुनीलकुमार सरनाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी दलितमित्र व्यंकाप्पा भोसले होते. डॉ.सरनाईक यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुहिक बुध्दवंदना करण्यात आली. विदयार्थी व विदयार्थीनीनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमप्रसंगी प्रा. सुनिल भोसले (संस्था कार्यवाह), मा.शिल्पा भोसले (संस्था सहकार्यवाह) मा. रेखा भोसेले (खजिनदार) मा.तानाजी नंदिवाले श्री शिवाजी कोरवी (माध्य व उच्च माध्य. मुख्याध्यापक), कृष्णा पाटील (प्राथमिक मुख्या.) इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. अनिल माने म्हणाले की, व्यक्तीची पूजा महत्वाची नाही तर त्यांचे विचार आचरणात आणा. चिकित्सक बना. वैचारीक बना. बाबासाहेबांचे लढे, चळवळ इ. समजून घेण्याचा प्रयत्न करा
कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकाप्पा भोसले मनोगतामध्ये म्हणाले कि, बहुजन मुला-मुलींना शिक्षण हाच पर्याय आहे. विदयार्थ्याना जेवणापेक्षा शैक्षणिक साहीत्याची गरज आहे. संविधानावर आलंलं संकट आपल्या विचारांनी दूर केले पाहीजे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदीप उबाळे, प्रास्ताविक निशिगंधा नलवडे व आभार प्रकाश वर्षे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.