डॉ.डी .वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाला विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद
schedule24 Jan 25 person by visibility 470 categoryशैक्षणिक
        कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक संघाने इंटर डिप्लोमा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत कोल्हापूर ,सांगली सातारा, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग येथील संघ सहभागी झाले होते.
विजयी संघामध्ये अथर्व शिंदे, हेथ छाब्रिया, मितेश पटेल ,यश पाटील यांचा समावेश आहे. या संघाने उपांत्य सामन्यात बीएसआयटी कोल्हापूर तर अंतिम सामन्यात वायबीआयटी सावंतवाडी संघावर विजय मिळवला. राज्यस्तरीय स्पर्धेत हा संघ सहभागी होणार आहे.
या संघाला प्राचार्य डॉ. महादेव नरके, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.अक्षय करपे, प्रा.सूरज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील,उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील ,विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले.