संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ६१ कुटुंबांचे स्वप्न साकार; स्पार्क मिंडा कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची निवड
schedule05 May 25 person by visibility 255 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते. देशातील नामवंत कंपनी स्पार्क मिंडा, पुणे या कंपनीने ६१ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या निवड प्रक्रियेत विविध इंजीनियरिंग महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे १४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एचआर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या निवडीसाठी इन्स्टिट्यूट ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आशिष पाटील, विभाग समन्वयक प्रा. प्रविण चव्हाण, प्रा. प्रथमेश गोंधळी , प्रा. विशाल तेली, संदीप पिंपळे यांचे सहकार्य लाभले.
स्पार्क मिंडा कंपनीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजसह स्पॉन्सर्ड डिग्री ऑफर केली आहे. पहिल्या वर्षी 2.40 लाख रुपये वार्षिक, दुसऱ्या वर्षी 3.60 लाख रुपये, आणि तिसऱ्या वर्षी 5.70 लाख रुपये एवढे सिटीसी देण्यात येणार आहे.
या यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.