राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मुलाखतीचे आयोजन
schedule05 May 25 person by visibility 231 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड कोल्हापूर या संस्थेमध्ये दिनांक 8 मे 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता Production Associate या पदाकरीता रोजगार भरतीसाठी कॅम्पस मुलाखत घेण्याकरीता आय.टी.सी लिमीटेड (इंडिया टोबॅको डिव्हीजन) रांजणगाव, पुणे या नामांकित कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
रोजगार भरती ही Permanent (Initially on a one year Probation) स्वरूपाची असून या मुलाखतीसाठी फिटर, टर्नर, मशिनिष्ट, दुल अॅण्ड डाय मेकर व एम.एम.टी.एम. या व्यवसायातील प्रशिक्षण व शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) पूर्ण झालेले उमेदवार या मुलाखतीसठी हजर राहू शकतात. तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड कोल्हापूरचे प्राचार्य महेश आवटे यांनी केले आहे.
▪️शैक्षणित पात्रता व मुलाखतीसाठी आवश्यक कागदापत्रे पुढीलप्रमाणे आहे.
इयत्ता 10 वी उत्तीर्ण कमीत कमी 60 टक्के गुणांसह- इयत्ता 10 व 12 मार्कशीट, आय.टी.आय उत्तीर्ण कमीत कमी 60 टक्के गुणांसह- आय.टी. आय. उत्तीर्ण मार्कशीट (All Semister), शिकाऊ उमेदवारी पूर्ण (Apprenticeship)- शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र (Apprenticeship Certificate), वयोमर्यादा 30 वर्षापर्यंत, पॅन कार्ड, मशीन मेन्टनन्स अनुभव कमीत कमी 3 वर्ष व 1 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. तरी उमेदवारांनी मुलाखतीसाठी https://forms.office.com/r/kj0t2t3Ri8 या लिंकवर नोंदणी करावी. असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.