SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अंतराळात पहिले मानवी पाऊल: अलेक्सी लिओनोव्ह यांचा तो चित्तथरारक प्रवास!कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटीलकोल्हापूर जिल्ह्यात ‘व्हिजन फॉर ऑल’ उपक्रमाची सुरुवात ५,२८० विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटपकोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या 'ईद फेस्टिव्हल'चे दिमाखात उद्घाटनबिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा; १.५३ लाखांचा अवैध गुटखा जप्तनेदरलॅन्ड्सच्या तज्ज्ञांकडून ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणवि‌द्यापीठ वि‌द्यार्थिनी वसतिगृहात हॉस्टेल डे उत्साहात31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा : आयुक्त के.मंजूलक्ष्मीपर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेट

जाहिरात

 

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री, आ. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अंबाबाईला साकड

schedule27 Nov 24 person by visibility 795 categoryराजकीय

▪️शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, बरे झालेल्या रुग्णांकडून मागणी

कोल्हापूर : गोरगरीब जनता आणि रुग्णांचे कैवारी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्री आणि पालकमंत्री पद मिळावे, यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि बरे झालेल्या रुग्णांकडून आई अंबाबाईला साकड घालण्यात आले. आरोग्य सेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू राहण्यासाठी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे, असे मत बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त केले. उपस्थित पदाधिकारी आणि रुग्णांनी आई अंबाबाईच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होऊ देत यासाठी प्रार्थना केली.

 वैद्यकीय मदत मिळालेल्या लहान मुलांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो दाखवत हेच मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रमेश खाडे, सुरेश माने, शिवसेना दक्षिण शहर प्रमुख अमरजा पाटील, शहर समन्वयक विनायक जरांडे, कागल तालुका महिला समन्वयक फरीन मकुबाई, विनायक जाधव, रमेश जाधव, निखिल निंबाळकर, देवगोंडा अवघडे, संदीप बोधे आदि उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes