SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिला समानता दिन: समानतेच्या हक्काची आणि प्रगतीची नवी क्षितिजेसीमेवरील जवानांसाठी करवीरकर भगिनींची ओवाळणी: 'एक राखी' ठरतेय बारा हत्तींचे नैतिक बळ!पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा : आमदार यड्रावकर ; पंचगंगा प्रदूषणासंदर्भात मुंबई मंत्रालयात बैठक संपन्न स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ, उचगावच्या सर्वागिण विकासासाठी १ कोटी रूपयांचा निधी देणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाहीआमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा : सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार राज्यात खळबळ! धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात 'एस.पी. गँग'वर कोल्हापुरात पहिलीच MCOCA कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपाताचा गोरखधंदा चालवणाऱ्या ११ जणांच्या मुसक्या आवळल्याडी. वाय. पाटील विद्यापीठाचा ‘टाटा स्किल्स’ सोबत सामंजस्य करारविभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसंजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन उत्साहात साजराएकल महिलांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरू

जाहिरात

 

‘ब्राह्मण बिझनेस फोरम’च्या वतीने ‘ब्रह्मउर्जा २०२५’ पुरस्कार वितरण उत्साहात !

schedule30 Nov 25 person by visibility 439 categoryसामाजिक

▪️उद्योगशिलता जपतांना सामाजिक भावनांची जाणीव ठेवा आणि वर्तमानात जगा ! :  सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक  सुनंदन लेले

कोल्हापूर  : आपण आपला उद्योग करतांना सामाजिक जाणीवांचे भान नेहमी ठेवले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, नेहमी देण्याची वृत्ती ठेवा, माणसांना जोडा, तसेच यश हे नेहमी सामूहिक असते हे नेहमी लक्षात ठेवा, असे मार्गदर्शन सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक  सुनंदन लेले यांनी केले. ‘ब्राह्मण बिझनेस फोरम’च्या वतीने ३० नोव्हेंबरला हॉटेल सयाजी येथे ‘ब्रह्मउर्जा २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध मान्यवरांना पुरस्कार दिल्यानंतर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ‘जेनरिक आधार’चे संस्थापक श्री. अर्जुन देशपांडे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. 

यात  सुनंदन लेले यांच्या हस्ते उत्कृष्ट उद्यमशीलता पुरस्कार  नितीन वाडीकर,  विजय पत्की, रोहिणी परांडेकर,  सचिन शानबाग, वेदमूर्ती सुहास जोशी यांना देण्यात येणार आले. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर ‘ब्राह्मण बिझनेस फोरम’चे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. २०१८ ला स्थापन झालेला फोरम ब्राह्मण उद्योजकांना सतत पुढे नेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. यात वर्षभर घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष  नरेंद्र जोशी, सचिव  अजिंक्य देशपांडे यांसह पदाधिकारी, तसेच ब्राह्मण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच शिस्तबद्ध, नियोजित वेळेत झालेल्या या कार्यक्रमाने उद्योजकांना एक नवी उर्जा प्रदान केली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes