पुण्यात एसीबीचा मोठा धमाका; २८ लाखांची लाच घेताना महिला पोलीस अधिकारी अटकेत!
schedule03 May 26 person by visibility 318 categoryगुन्हे
पुणे : पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतून नुकतीच मुंबई लोहमार्ग पोलीस दलात बदली झालेली पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार हिला २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुण्याच्या बंडगार्डन परिसरातील एका तारांकित हॉटेलसमोर शनिवारी ही धडाकेबाज कारवाई केली.
एका तक्रार अर्जाच्या चौकशीत मदत करण्यासाठी तोटेवार यांनी ३० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी २ लाख रुपये त्यांनी आधीच घेतले होते, तर उर्वरित २८ लाख रुपये स्वीकारण्यासाठी त्यांनी एका मध्यस्थाला पाठवले होते.
एसीबीने रचलेल्या सापळ्यात तोटेवार आणि त्यांचा मध्यस्थ दोघेही अडकले. १ मे रोजीच कार्यमुक्त झालेल्या या महिला अधिकाऱ्याच्या अटकेने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.