घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू, 46 लोक जखमी ; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
schedule13 May 24 person by visibility 400 categoryगुन्हे

मुंबई : घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून 46 लोक जखमी झाले आहेत. याबाबत आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आणि जखमी लोकांना मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
आज दुपारी जोरात वादळी वाऱ्यासह मुंबई परिसरात अवकाळी पावसाने झोडपले या दरम्यान घाटकोपर येथे भव्य होर्डिंग बाजूच्या पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळले व ते खाली आले पाऊस आल्यामुळे पेट्रोल पंपाच्या छताखाली आश्रय घेतलेल्या शंभर ते दीडशे लोकांच्या अंगावर ते पडले. या झालेल्या दुर्घटनेत 14 जणाांच मृत्यू झाला असून 46 लोक जखमी झाले आहेत या जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अजून बचाव कार्य सुरू आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री घटनास्थळी भेट दिली यावेळी त्यांनी या दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या लोकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले तसेच सर्व जखमींचे मोफत उपचार होईल असे सांगितले तर होर्डिंग दुर्घटनेची बीएमसी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे तसेच दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या लोकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत मुंबईतील सर्व होल्डिंगचे आता ऑडिट होणार आहे व कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
