SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे : आ . राजेश क्षीरसागरकोल्हापूर एलसीबीचा 'डाव'; कर्नाटकचा अट्टल चोरटा गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करारजोतिबा चैत्र यात्रेसाठी कोल्हापूर पोलिसांचे कडक वाहतूक नियोजन; जड वाहनांना बंदी व पार्किंगचे नवे नियम लागूकोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात रविवारी स्वच्छता मोहिमकोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा! सोमवारी शहराचा पाणी पुरवठा बंदडॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ पुस्तकाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती पुरस्कार जाहीरश्वास, ध्यास आणि जगण्याचं शास्त्र... रंगभूमी!कांचनताई परुळेकर यांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली - महापौर रूपाराणी निकम; स्मृतीदालनाचे उद्घाटनसुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार: जिल्हाधिकारी अमोल येगडे

जाहिरात

 

कोल्हापूर एलसीबीचा 'डाव'; कर्नाटकचा अट्टल चोरटा गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

schedule27 Mar 26 person by visibility 107 categoryगुन्हे

कोल्हापूर : जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कंबर कसली असून, गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक मोठा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी कर्नाटक राज्यातील हुक्केरी येथील एका रेकॉर्डवरील अट्टल चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ५ लाख ३२ हजार ७१३ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना, पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना खास बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. गडहिंग्लज येथील घरफोडीतील संशयित आरोपी आनंदा सोमाप्पा सुटकनवार (वय २८, राहणार हुक्केरी, जिल्हा बेळगाव) हा चोरीचे दागिने घेऊन गडहिंग्लज-संकेश्वर रोडवरील हिटणी फाटा येथे येणार असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने हिटणी फाटा येथे सापळा लावून संशयिताला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे ३३.६२० ग्रॅम सोन्याचे दागिने, १२६.९२० ग्रॅम चांदीचे दागिने आणि भारतीय चलनातील विविध दराची ६८० रुपयांची नाणी असा एकूण ५.३२ लाखांचा मुद्देमाल मिळून आला. सखोल चौकशीत त्याने गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी गडहिंग्लज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes