यड्राव येथील कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीस विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांची सदिच्छा भेट
schedule02 May 25 person by visibility 263 categoryसामाजिक

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी लि; यड्राव येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी सूतगिरणी परिसराची पाहणी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर), राजेंद्र झेले,राजेंद्र नांद्रेकर, संभाजी मोरे,माजी नगरसेवक राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख,राहुल बंडगर,महेश कलकुटगी,दादा पाटील चिंचवाडकर, कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सूतगिरणीचे संचालक प्रकाश लठ्ठे,सुभाष मुरगुंडे, मिलिंद शिंदे,अशोक मळगे आदी मान्यवर उपस्थीत होते.