+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापूर महानगरपालिका : 6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु adjustशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त के.एम.टी. उपक्रमामार्फत "ऐतिहासिक वास्तू दर्शन" सहलीसाठी विशेष बससेवा adjustचप्पल लाईन येथील विद्युत सेवावाहिनी शिफ्टिंगचे काम सुरु; 'आप'च्या मध्यस्तीस यश adjustशिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावासाठी 35 लाखाची तरतूद करा : आमदार जयश्री जाधव; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली सूचना adjust'गोकुळ’ मध्ये योग दिन उत्साहात साजरा... adjustज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हास्तरीय समितीचे काम महत्त्वपूर्ण : सहायक आयुक्त सचिन साळे adjustराधानगरी धरणात 2.19 टीएमसी पाणीसाठा; तर जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणी पातळी... adjustशारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगा महत्त्वाचा : जिल्हाधिकारी अमोल येडगे adjustसंजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीचे MHT-CET परीक्षेत यश adjustराजर्षी शाहू जयंती उत्सवानिमित्त शाहू स्मारक भवनात उद्यापासून व्याख्यानमाला
SMP_news_Gokul_ghee
schedule11 Jun 24 person by visibility 326 categoryशैक्षणिक
 कोल्हापूर : जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अभियांत्रीकीचा ठसा आहे. अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे 'प्रॉब्लेम सॉल्व्हर्स' असून समाजासाठी सुविधा निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य अभियंते करतात. अन्य कोणत्याही अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या सर्वाधिक संधी असून अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी आपली आवड, क्षमता व संधी लक्षात घेऊन योग्य शाखा निवडावी, असे आवाहन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले. 
     
 डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा (स्वायत्त संस्था) आयोजित 'अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४' बाबत मार्गदर्शनपर सेमिनारमध्ये ते बोलत होते. हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात हा सेमिनार झाला. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ व्ही. व्ही. भोसले, सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेमेंटचे संचालक डॉ अजित पाटिल, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, प्रवेश प्रक्रिया प्रमुख रविंद्र बेन्नी यांच्या प्रमुख उपस्थिती दीपप्रज्वलन व गजानन महाराज प्रतिमा पूजनाने सेमिनारचा शुभारंभ झाला. 

▪️उत्तम करिअरचा मार्ग
      अभियंत्यांची संख्या वाढल्याने त्यांना पुरेशा नोकऱ्या नसल्याचे सांगितले जाते. मात्र वस्तुस्थिती पाहता सर्वधिक करिअरची संधी अभियांत्रिकीमध्येच आहे. कॉम्प्युटर शाखा म्हणजे हमखास नोकरी असा विद्यार्थ्याचा समज झाला आहे. मात्र, अन्य शाखामध्येही तेवढ्याच संधी आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सरकारी नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत. वाहन उद्योग, थ्रीडी प्रिंटींग यामुळे मॅकेनिकल शाखेचे महत्व अबाधित आहे. रसायन उद्योग, फार्मा सेक्टरसह अन्यत्र केमिकल इंजिनिअरला मोठ्या संधी आहेत. मोबाईल व अन्य गॅझेटचे मार्केट वेगाने वाढत असून इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशमध्ये अभियंत्यांना मोठी संधी आहे. कॉम्प्युटरच्या विविध शाखांमध्येही अगणित संधी आहेत. येत्या काळात डेटा सायन्स आणि एआयएमएल अभियंत्यांची मागणी खूपच वाढणार आहे. त्यामुळे आपली आवड, बाजाराची गरज व संधी ओळखून योग्य शाखा निवडावी, असे आवाहन डॉ गुप्ता यांनी केले.

▪️विविध स्कॉलरशिप उपलब्ध
   डॉ. गुप्ता म्हणाले, अभियांत्रिकीचे शिक्षण महागडे आहे असा गैरसमज आहे. मात्र, या शिक्षणासाठी राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती व सवलती लागू आहेत. तसेच डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप सुरु आहे. त्यामुळे शिक्षण महागडे नाही. देशभरात स्टार्ट अपची संख्या वेगाने वाढत असून सरकारकडूनही प्रोत्साहन मिळत आहे. अभियंत्यांसाठी या क्षेत्रात मोठी संधी आहे. त्यामुळे कोणत्याही अन्य अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये करिअरच्या सर्वधिक संधी आहेत. 

▪️सतत विस्तारणारे क्षेत्र
लोकांच्या गरजा व अपेक्षा वाढत जातील त्याप्रमाणे अभियांत्रिकी क्षेत्रही सतत विस्तारत जाणार आहे. पुढील काळात अभियांत्रिकीच्या माध्यमातून ऑटोनॉमस ड्राईव्हिंग, रोबोट फार्मिंग, स्टेन अँड डस्ट फ्री क्लॉक, इलेक्ट्रोनिक बॉडी पार्ट आदी सुविधा निर्माण करण्यासाठी संशोधन सुरु आहे. कोणतेही नवे बदल आणि प्रगतीमध्ये अभियांत्रिकीचे योगदान सर्वाधिक असल्याने या क्षेत्रात येणाऱ्याचे भविष्य अतिशय उज्ज्वल राहील असा विश्वास डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केला.

सीईटीचा निकाल लवकरच लागणार असून अभियांत्रिकीसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पंधरा दिवसांनी सुरु होईल. यामध्ये कोणती शाखा निवडावी, अर्ज कसा भरावा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्रे लागतील, सीट अलोटमेंट याबाबतही डॉ. गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न व शंकांचे सविस्तर निरसन डॉ.गुप्ता यांनी केले. 

  सूत्रसंचालन प्रा. राधिका ढणाल, प्रा. सुनंदा शिंदे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.