हज यात्रेनिमित्त तपासणी व लसीकरण शिबीराचे आयोजन
schedule27 Jan 26 person by visibility 68 categoryसामाजिक
कोल्हापूर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, हज कमिटी ऑफ इंडिया व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हज यात्रा-2026 अंतर्गत सेवा रुग्णालय कसबा बावडा व इंदिरा गांधी जनरल हॉस्पिटल इचलकरंजी येथे हज यात्रेकरूंसाठी वैद्यकीय तपासणी व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य स्तरावरून लसीचा पुरवठा झाला असून यात्रेकरुंना मेनिनजायटीस प्रतिबंधक लस व सिझनल इंफ्लूएन्झा लसीकरण करण्यात येणार आहे.
यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंची 299 इतकी संख्या आहे. हे वैद्यकीय तपासणी शिबीर बुधवार 28 व गुरुवार 29 जानेवारी होणार असून लसीकरण शिबीर हे 30 जानेवारीला होणार आहे याचा जिल्ह्यातील हज यात्रेकरूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.