शाहू स्मारक भवन इमारतीचे नूतनीकरण; लवकरच नागरिकांसाठी होणार खुले
schedule27 Jan 26 person by visibility 109 categoryराज्य
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्याकडील शाहू स्मारक भवन इमारतीमधील मुख्य सभागृह/नाट्यगृह, पश्चिम बाजूकडील विश्रामगृह तसेच पश्चिम बाजूचे चार दुकानगाळे येथे सध्या नूतनीकरण व दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे. या नूतनीकरणाअंतर्गत पश्चिम बाजूचे चार दुकानगाळे कायमस्वरूपी बंद करून त्या ठिकाणी अद्ययावत लाऊंज, व्ही.आय.पी. प्रवेशद्वार, ग्रीन रूम, वेटिंग स्पेस तसेच मुख्य मंचाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.
सध्या त्या ठिकाणी सुरू असलेल्या उपहारगृह व अन्य व्यवसायिकांना कायदेशीर नोटीस देण्यात आली असून, ट्रस्टकडे असलेली त्यांची अनामत रक्कमही परत करण्यात आली आहे.
नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर अद्ययावत स्वरूपातील मुख्य नाट्यगृह/सभागृह व विश्रामगृह लवकरच कोल्हापूरच्या नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे सचिव गजानन गुरव यांनी दिली.