SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शाहू स्मारक भवन इमारतीचे नूतनीकरण; लवकरच नागरिकांसाठी होणार खुलेतात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक विकास कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवा : जिल्हाधिकारी अमोल येडगेहज यात्रेनिमित्त तपासणी व लसीकरण शिबीराचे आयोजनहूबळी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनुरकर उपविजेता31 मार्चपूर्वी 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा : प्रशासक के. मंजूलक्ष्मीडीवायपी साळोखेनगर इंक्युबेशन सेंटर येथे ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ प्रशिक्षण संपन्नडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहातकोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे

जाहिरात

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६

schedule27 Jan 26 person by visibility 80 categoryसामाजिक

  🔹️विनापरवानगी जाहिराती आढळल्यास कारवाई होणार, राजकीय जाहिरात प्रसिद्ध करताना आयोगाच्या नियमावलीचे पालन करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ अंतर्गत राजकीय जाहिराती प्रसिद्ध करताना राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या किंवा विनापरवानगी आढळणाऱ्या जाहिरातींवर कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 'माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती'च्या (MCMC) बैठकीत केल्या.

  यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या वतीने सोशल मीडियाद्वारे कोणत्याही प्रकारचे विनापरवाना 'पेड बूस्टिंग' किंवा पेड जाहिरात प्रसिद्ध होता कामा नये. अशा प्रसिद्धीचा खर्च संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करावा. निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करताना आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे.

  निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने उमेदवार, राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी विविध माध्यमांचा वापर करून प्रचार करत असतात. होर्डिंग्ज, फ्लेक्स, एलइडी प्रचार वाहने तसेच रिक्षा यांसाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर 'एक खिडकी' योजनेतून आवश्यक परवानग्या घ्याव्यात. तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, ज्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, व्हॉइस कॉल आणि मजकूर (Text Message) यांचा समावेश आहे, त्यांच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा. त्यानंतर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमार्फत (MCMC) आवश्यक प्रमाणपत्र दिले जाईल.

  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यामध्ये टीव्ही, केबल नेटवर्क, केबल चॅनेल्स, चित्रपटगृहे, खासगी एफएम वाहिन्या, सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणारे दृकश्राव्य प्रदर्शन, मोठ्या प्रमाणात पाठवले जाणारे एसएमएस व व्हॉइस मेसेजेस, विविध समाजमाध्यमे आणि इंटरनेट वेबसाइट्सवरील जाहिरातींचा समावेश होतो. या माध्यमांवर प्रसिद्धी करण्यापूर्वी मजकूर प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. या नियमावलीचे पालन न करता मजकूर प्रसारित केल्याचे किंवा आक्षेपार्ह आशय आढळल्यास आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

  पेड न्यूजबाबत माध्यम कक्ष सक्रिय: आचारसंहिता कालावधीत उमेदवारांकडून प्रचारासाठी 'पेड न्यूज' प्रसारित होण्याची शक्यता असते. यावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयात विशेष माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा कक्ष सर्व प्रकारच्या बातम्यांची पडताळणी करून पैशांच्या मोबदल्यात दिलेल्या बातम्यांची दखल घेईल. यात विविध मुद्रित माध्यमांसह पोर्टल, यूट्यूब चॅनेलचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधित उमेदवारांना नोटीस देऊन विचारणा केली जाईल. 'पेड न्यूज' सिद्ध झाल्यास त्याचा खर्च उमेदवाराच्या प्रचार खर्चात धरला जाईल आणि नियमानुसार आचारसंहिता भंगाची कारवाई देखील केली जाईल.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes