पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यापूर्वीच इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती पदाधिकाऱ्यांना अटक
schedule12 Sep 24 person by visibility 260 categoryराज्य
इचलकरंजी : शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड पाणी योजना योजना राबवण्यात शासन दुर्लक्ष करत आहे याच्या निषेधार्थ सुळकुड पाणी योजना कृती समितीच्यावतीने गुरुवारी इचलकरंजी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार होती. दरम्यान, आंदोलनाच्या पूर्वीच आंदोलकांना अटक करण्यात आली.
आंदोलक राजाराम स्टेडियम परिसरात एकत्र आले होते यावेळी आंदोलकांनी पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणते देत नाही, चले जाओ चले जाओ पालकमंत्री चले जाओ. अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलकांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक व पोलिसात झटापट झाली.
यावेळी अटक केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीचे मदन कारंडे लालबावट्याचे सदा मलाबादे, काँग्रेसचे राहुल खंजिरे, स्वाभिमानीचे विकास चौगुले, नागरिक मंचेचे अभिजीत पटवा, शिवसेनेचे सयाजी चव्हाण आधीच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांचा समावेश आहे. दोन पोलीस व्हॅन मधून सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.