+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustअतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग बंद adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना adjustबेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबई मनपा आयुक्तांना सूचना adjustबापट कॅम्पमधील मूर्तिकारांना मार्केट यार्डात निवारा शेड उपलब्ध करा : सतेज पाटील यांच्या सूचना; पूरग्रस्त भागाची केली पाहणी adjustकाँग्रेसच्या समन्वय समितीत आमदार सतेज पाटील adjustबनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस adjustराज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा adjust'‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस adjustघाबरुन न जाता वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करा; शासन आपल्या पाठीशी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला पूरग्रस्तांना धीर adjustकोल्हापुरातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प परिसराती 228 नागरीकांचे स्थलांतर
1000867055
1000866789
schedule12 Jun 23 person by visibility 978 categoryआरोग्य
कोल्हापूर : राजारामपूरी 1 ली गल्ली येथील डॉ.सोनल वालावलकर यांच्या श्री हॉस्पिटल रिसर्च ॲन्ड इन्स्टीटयूटबाबत प्रशासनाकडे तक्रार आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा प्रशासन व महापालिकेच्यावतीने स्टींग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी डॉ.सोनल वालावलकर या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी एका महिलेस प्रशासनामार्फत डिकॉय केस म्हणून पाठविण्यात आले होते. या गरोदर महिलेकडून गर्भलिंग चाचणी साठी रु.15,000/- घेतलेचे स्टींग ऑपरेशन मध्ये आढळून आले आहे. त्यामुळे या हॉस्पीटलमधील सोनोग्राफी मशिन विभागीय समुचित प्राधिकारी डॉ.रति अभिवंत व पंच यांनी समक्ष सीलबंद केले. 

यावेळी पोलिस प्रशासन व आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव तथा समुचित प्राधिकारी पी.सी.पी.एन.डी.टी. कमिटी, सीपीआरच्या निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.हर्षला वेदक, ॲड गौरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या गीता हासुरकर व संबंधित गरोदर महिला व त्यांचे पती यांचे सहकार्य लाभले. या हॉस्पिटलवर पुढील आवश्यक ती कारवाई पीसीपीएनडीटी ॲक्ट अंतर्गत व शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार सुरु आहे.

   तरी शहरातील गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात होत असल्यास जागरूक नागरिकांनी या संदर्भात टोल फ्री क्रमांक 18002334475 या नंबरवर संपर्क साधावा किंवा याबाबत प्रशासनास माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.