कोल्हापूर : जीवबानाना पार्क व आपटेनगर परिसरातील घरफाळा थकबाकीपोटी 14 मिळकती सील
schedule09 Mar 25 person by visibility 317 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना दंडात 80 टक्के सवलत देण्यात आली होती. परंतू सवलत देऊनही काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. अशा थकबाकीदारांच्या मिळकतीवर घरफाळा विभागाच्यावतीने कारवाई करण्यास सुरु केले आहे. यामध्ये आज घरफाळा विभागीय कार्यालय क्र.1 गांधी मैदानअंतर्गत जीवबानाना पार्क व आपटेनगर परिसरातील 14 मिळकतींवर सीलची कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये प्रकाश काशिनाथ मोरे (4 मिळकतीची रक्कम रु.1,10,437/-), सुर्याजी भिमराव इंगळे (5 मिळकतीची रक्कम रु.1,64,205/-), रामाश्रय बिल्ड.ॲन्ड डेव्ह. (2 मिळकतीची रक्कम रु.55,781/-), श्रीनिवास अनिल वनारसे (1 मिळकतीची रक्कम रु.21,470/-), वसंत दत्तात्रय पारळे (1 मिळकतीची रक्कम रु.19,543/-) व स्नेहल प्रविण हुन्नूरे (1 मिळकतीची रक्कम रु.17,242/-), अशी एकूण 14 मिळकतधारकांची थकीत रक्कम रुपये 3 लाख 88 हजार 678 इतकी थकबाकी असलेने सदरच्या मिळकती सील करण्यात आलेल्या आहेत.
तरी शहरातील थकबाकीदारांनी अद्यापही आपला घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी आपला थकीत घरफाळा भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार सदरची मिळकत सील किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.