कोल्हापूर : राजारामपुरी 10 वी गल्लीतील बेसमेंटमधील बी.सी.ए. क्लास सील; बेसमेंटमधील पाच व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना
schedule06 Mar 25 person by visibility 594 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील राजारामपुरीमधील बेसमेंटमध्ये विनापरवाना व्यवसाय करणा-या व्यवसाय धारकांवर महानगरपालिकेच्यावतीने आज कारवाई करण्यात आली. यामध्ये सिसनं.1894 राजारामपुरी 10 वी गल्ली येथील प्रोफेसर कवचाळे यांचे बेसमेंटमधील बी.सी.ए. क्लासेसवर कारवाई करुन सदरचा क्लास सील करण्यात आला. त्याचबरोबर या परिसरातील व्ही.व्ही.इंजिनियर्स प्रोप्रा.संजय शिंदे व आषुतोष शिंदे यांचे पॅशन लाऊंज वेअर, समर्थ मिडीया, सिटी कार, 6 सेन्सचे कपड्याचे दुकान व महेंन्द्र ज्वेलर्स यांनी बेसमेंटमधील व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर संबंधितांनी आपला बेसमेंटमधील व्यवसाय बंद केले आहेत. हि तपासणी परवाना विभाग, नगररचना विभाग व अग्नीशमन विभागामार्फत संयुक्त करण्यात आली.
ही कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, परवाना अधिक्षक अशोक यादव, नगररचना विभागाचे खुशालचंद राजमाने, दत्तात्रय पारधी, तान्हाजी पारखे, अग्निशमन विभागाचे स्टेशन ऑफिसर जयवंत खोत, फायरमन अभिजीत सरनाईक, परवाना विभागाचे परवाना निरिक्षक मंदार कुलकर्णी, रविंद्र पोवार, निलेश कदम, लियाकत बारस्कर, शकील पठाण उपस्थीत होते.
तरी शहरातील सर्व नागरिकांना सुचीत करण्यात येते की इमारतीच्या बेसमेंटमध्ये विनापरवाना व्यवसाय करत असलेस तो स्वत:हून बंद करण्यात यावा अन्यथा कोल्हापूर महानगरपालिकेकडून सिलची कारवाई करणेत येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.