'गोकुळ'कडून गाय दूध खरेदी दरात १ रुपये वाढ : चेअरमन विश्वास पाटील
schedule27 Aug 22 person by visibility 2056 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दूध खरेदी दरामध्ये रविवार (दि. २१)पासून संघाने सध्याचे गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. त्यास अनुसरून गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर १ रुपये वाढ केलेली आहे. गुरुवार (दि. २५) रोजीच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.
तरी रविवार (दि.२१) पासून गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रुपये ३१.०० असा दर राहील, अशी माहिती पाटील यांनी दिली. गाय दूध खरेदी दरात चार वेळा वाढ करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे, असे पाटील म्हणाले.
तसेच सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.