SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची दुबईस्थित कंपनीमध्ये वार्षिक 11.2 लाख रुपये पॅकेजसह निवड; इन्स्टिट्यूटची विक्रमी झेपभाजपाच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांक तब्बल 1 लाखाचे बक्षीसकेआयटीत ‘वाचन प्रेरणा दिन’ परिसंवाद’ व ‘संविधान वाचना’ने संपन्नसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यशकोल्हापुरात जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्याचा मृत्यूपर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी; मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभागराज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छासुशासनासाठी तंत्रज्ञानाधारित प्रशासनाची गरज : व्ही. श्रीनिवासभारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी एस.एस.बी. कोर्ससाठी मोफत प्रशिक्षणशिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून दीपोत्सव उत्साहात

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेतील आढावा बैठक म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' : आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील याचे पत्रक

schedule04 Oct 25 person by visibility 264 categoryराजकीय

कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. राजेश क्षीरसागर व आ. अमल महाडिक यांच्या उपस्थितीत शहरातील प्रश्नांवर महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आ. क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचे नाटक केले. जीवघेणे खड्डे, आठवडा-आठवडाभर ठप्प असलेला पाणीपुरवठा, अपूर्ण दर्जाहीन शंभर कोटी रस्ते प्रकल्प, कचरा उठावाचा उडालेला बोजवारा हा काय आजचा विषय नाही. गेले अनेक वर्षे त्याच त्याच प्रश्नांना शहरातील नागरिकांना तोंड द्यावे लागत असताना, नेमके निवडणुकीच्या तोंडावर अधिकाऱ्यांना जाब विचारायचे शहाणपण आमदारांना आताच कसं सुचलंय?

निधी आणायचं काम आमचं आहे, राबवायचं काम अधिकाऱ्यांचं असं म्हणणे म्हणजे जबाबदारी झटकनं आहे. आज राज्यातील सरकार तुमचं, मंत्री तुमचे आहेत. मग अधिकारी तुमचं का ऐकत नाहीत? एखादे टेंडर काढायचं किंवा थांबायचं असेल, कंत्राटदाराला अभय द्यायचं असेल तेव्हा तुम्ही फोन केल्यावर अधिकारी कसे लगेच काम करतात? तेच अधिकारी जनतेचं काम करताना का बरं तुमचं ऐकत नाहीत?

शहरातील मतदारांनी तुम्हाला फक्त निधी आणण्यापुरतं निवडून दिलेलं नाही. कामं दर्जेदार व्हावीत, मूलभूत सुविधा मिळाव्यात हे बघणं, त्यावर देखरेख ठेवणं तुमचं काम आहे. 

आपली जबाबदारी न पार पाडता फक्त अधिकाऱ्यांवर  गुरगूरनं, आपलं अपयश लपवण्यासाठी अधिकाऱ्यांवर खापर फोडणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. 

ड्रेनेज घोटाळ्याचे आरोप केले गेले, त्याचे पुढे काय झाले? ज्यांनी आरोप केले ते कारभारी चिडीचूप्प आहेत. अधिकाऱ्यांच्या अहवालावर कारवाई नाही. अखंड स्लॅब कोसळला, माणसं मेली तरी या व्यवस्थेला त्याचं सोयरसुतक नाही.

महापालिकेच्या बैठकीत उपस्थित माजी पदाधिकारी गेले 20-20 वर्षे सत्तेत आहेत. महापौर, स्थायी समिती सभापती ही सगळी पदे या कारभाऱ्यांनी दरम्यानच्या काळात भूषवली आहेत. महापालिकेच्या पहिल्या मजल्यावर यातील काही भ्रष्टाचारी  वावरतात, त्यांचा नायनाट करायला अजूनही का जमलेले नाही? 

या सगळ्या थोतांडाला आता कोल्हापूरची जनता वैतागली आहे. जर कुंपणच शेत खात असेल तर अशा बैठका घेऊन शहरातील नागरिकांची दिशाभूल करणे थांबवलेलेच बरे. असे पत्रक आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes