SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रभाग क्रमांक 19 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा विजयाची खात्री देणाराझोपडपट्टीधारकांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावणार : जस्मिन जमादारप्रभाग क्रमांक 11 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबाविरोधकांना थेट पाईपलाईन फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आठवते : सतेज पाटील; महाविकास आघाडीची निकम पार्क येथे जाहीर सभाकोल्हापूर स्मार्ट शहर बनवण्यासाठी महानगरपालिकेत महायुतीची सत्ता हवी : खासदार धनंजय महाडिक; प्रभाग क्रमांक 11 मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विजय निर्धार सभा‘गोकुळ’ चा प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक उच्चांकMPSC परिक्षेसाठी जिल्ह्यातील 83.71 उमेदवार उपस्थितकोल्हापूर महानगरपालिकेच्या बायोगॅस प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सुरुवातकोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 -26 मतदार जनजागृती (SVEEP) अंतर्गत 2700 विद्यार्थ्यांनी साकारली मानवी रांगोळीही निवडणूक माझ्यासाठी सेवेचा संकल्प; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय नक्की : ओंकार जाधव

जाहिरात

 

झोपडपट्टीधारकांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावणार : जस्मिन जमादार

schedule12 Jan 26 person by visibility 120 categoryराजकीय

कोल्हापूर : झोपडपट्टीधारकांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करून सोडविण्याचे माझे 'व्हिजन' असल्याचे जस्मिन जमादार यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक १५ (ब) मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातील महायुतीच्या भाजप उमेदवार म्हणून जस्मिन जमादार निवडणूक रिंगणात आहेत.

जस्मिन जमादार यांनी प्रभाग क्रमांक १५ (ब) मधील टाकाळा, टेंबलाई नाका रेल्वेफाटक, उड्डाणपूल वसाहतीसह परिसर मातंग ठिकठिकाणी मतदारांशी संवादावेळी त्यांनी ही ग्वाही दिली . त्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या समस्याही जाणून घेतल्या. जस्मिन जमादार म्हणाल्या, सातत्याने पाठपुराव्यातून झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देऊन घराचे 'मालक' बनविण्यावर आपला भर राहील. प्रॉपर्टीकार्डचा प्रश्न आपल्या अजेंड्यावर प्राधान्याने असल्याचेही त्या म्हणाल्या. 

 जमादार म्हणाल्या, बराच काळ प्रलंबित असणारा हा प्रश्न सोडविणे अडचणीचे असले तरी सातत्याने प्रयत्न, पाठपुरावा केल्यास हा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल. पालकमंत्री आबिटकर, वैद्यकीय प्रकाश शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राज्य नियोजनं मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सहकायनि मंत्रालयात पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्याने प्रयत्न केला जाणार आहे.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आजम जमादार म्हणाले, झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टी कार्डबाबतची कागदपत्रे आणि प्रॉपर्टीकार्ड मागणीचा प्रस्ताव आपल्याकडे तयार आहेत.  हा प्रश्न सोडविणे हेच आमचे व्हिजन आहे. केवळ झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टीकार्ड मिळवून न देता घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्यावर आपला विशेष भर राहणार असल्याचे जमादार यांनी सांगितले. 

यावेळी सागर केंगारे, ओंमकार घाडगे, आकाश गायकवाड, हाजी शहानवाज शेख, प्रशांत अवघडे, सचिन घाडगे, फिरोज मुजावर, जहाँगिर जमादार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes