प्रभाग क्रमांक 19 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा विजयाची खात्री देणारा
schedule12 Jan 26 person by visibility 145 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 11 मधून महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसच्या हात या चिन्हावर दुर्वास कदम, शुभांगी पोवार, डॉ. सुषमा जरग, मधुकर रामाणे निवडणूक रिंगणात आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर कस्सं ? तुम्ही म्हणशीला तस्सं! या अभियानातून कोल्हापूरच्या विकासाचा नव संकल्प करण्यात आला आहे. प्रभागांमध्ये उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा त्यांच्या विजयाची खात्री देणार आहे.
प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून दुर्वास कदम, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला विभागातून शुभांगी पोवार तर सर्वसाधारण महिला गटातून डॉ. सुषमा जरग व सर्वसाधारण गटातून मधुकर रामाणे हे निवडणूक रिंगणात आहेत. प्रभागांमध्ये उमेदवाराकडून प्रचार फेरी गाठीभेटी रॅली द्वारे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
जनतेच्या डोळ्यात प्रेम, आपुलकी आणि विश्वास पहिला आहे. हा विश्वास नुसत बोलून तयार होत नाही.तो मनापासून केलेल्या कामातून, प्रामाणिक प्रयत्नातून आणि आपुलकीने तयार होतो. अशी भूमिका दुर्वास बापू कदम यांनी व्यक्त केली. यामुळे मतदार आपल्याला साथ देतील असा विश्वास व्यक्त केला.
दुर्वास बापू कदम, मधुकर रामाणे यांनी यापूर्वी प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. उमेदवारांना सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी लाभली असून प्रभागामध्ये विविध उपक्रमाद्वारे, कार्याद्वारे ते मतदारांना परिचित आहेत. यामुळे प्रभागात त्यांना वाढता पाठिंबा त्यांच्या विजयाची खात्री देणारा ठरत आहे.

