लश्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा पाकिस्तानात खात्मा
schedule18 May 25 person by visibility 237 categoryविदेश

नवी दिल्ली : लश्कर -ए- तोयबाचा कमांडर दहशतवादी सैफुल्ला खालिद याची पाकिस्तानात हत्या झाली. पाकिस्तानातील सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. भारतातील तीन हल्ल्यांमध्ये सैफुल्लाचा सहभाग होता. भारतासाठी तो मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता.
सैफुल्ला खालिद हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर होता. लश्कर-ए-तोयबाने त्याला भारतात हल्ल्यांची तयारी करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, तो अनेक वर्षे नेपाळमध्ये तळ ठोकून होता आणि तेथूनच भारतात सतत दहशतवादी हल्ले करत होता.
भारतीय गुप्तचर संस्थांना त्याच्याबद्दल माहिती मिळताच तो नेपाळमधून पाकिस्तानात पळाला. 2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर हल्ल्याचा कट, 2001 मध्ये रामपूरमधील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ला आणि 2005 मध्ये बंगळुरूमधील हल्ला यात सैफुल्लाचा सहभाग होता.