कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मोफत विधी सेवा सहाय्य विधीज्ञांची नियुक्ती
schedule03 Dec 25 person by visibility 39 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील आजी माजी सैनिक, युध्द विधवा, वीर माता-पिता, माजी सैनिक, सैनिक विधवा व अवलंबितांना मोफत विधी सेवा सहाय्य देण्याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे विधी सेवा चिकित्सा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात शासकीय सुट्ट्या वगळून मोफत विधी सेवा सहाय्य देण्याकरीता पुढील विधीज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमवार व मंगळवार- अँड विद्या संजय निकम- 9665495956, बुधवार व गुरुवार- अॅड धनश्री वि. कोळेकर-9175318392 व 9112872909, शुक्रवार- अँड श्री. प्रशांत सुरेश मिसाळ- 8830122817 व 9860625725 याप्रमाणे आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त आजी माजी सैनिक/युध्द विधवा/ वीर माता-पिता/माजी सैनिक, सैनिक विधवा व अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.