मलकापूर नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारार्थ आमदार डॉ.विनय कोरे यांनी मतदारांशी साधला संवाद
schedule28 Nov 25 person by visibility 83 categoryराजकीय
कोल्हापूर : मलकापूर (ता.शाहूवाडी) येथे मलकापूर नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारार्थ विविध प्रभागांमधील मतदारांच्या आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी गाठीभेटी घेतल्या तसेच मतदारांशी संवाद साधला.
मलकापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ जनसुराज्य - भाजपा महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रश्मी शंतनू कोठावळे यांच्यासह २० नगरसेवक पदाच्या उमेदवारांना येत्या २ डिसेंबर रोजी प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे (आप्पा),प्रकाश पाटील (भाऊ),माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर,माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील,रमेश चांदणे यांच्यासह सर्व जनसुराज्य - भाजपाचे सर्व उमेदवार,पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.