SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
माता-भगिनींच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची कवचकुंडले सदैव माझ्यासोबत: मंत्री हसन मुश्रीफभारतातील राष्ट्रीय शिक्षण दिन: ज्ञान आणि प्रगतीचा पायाशेतकऱ्यांच्या बांधावर खासदार धैर्यशील माने यांची दिवाळी‘गोकुळ’च्या चेअरमनपदी माजी आमदार राजेश पाटील यांची निवडकोरे अभियांत्रिकीमध्ये पीबीएल दिन उत्साहात गोकुळ'च्या अध्यक्षाची आज हायव्होल्टेज निवडणूक; शासननियुक्त संचालकांमुळे राजकीय संघर्ष टोकालाशांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन: विज्ञान, शांतता आणि मानवी प्रगतीचा संगमएकमेकांच्या हातात हात घालून दुष्काळावर मात करूया : पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटीलऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळीगोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन होण्याचा मार्ग मोकळा?

जाहिरात

 

माता-भगिनींच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची कवचकुंडले सदैव माझ्यासोबत: मंत्री हसन मुश्रीफ

schedule11 Nov 26 person by visibility 116 categoryराज्य

◼️भाऊबीजेच्या पवित्र पर्वावर माता-भगिनींकडून नामदार मुश्रीफांचे औक्षण

कोल्हापूर : भाऊबीज हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, जिव्हाळा, आपुलकी, विश्वास आणि नात्यांमधील अतूट बंध जपणारा एक पवित्र सण आहे. याच मंगलमय भाऊबीजेच्या निमित्ताने माता-भगिनींनी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे औक्षण करून त्यांना प्रेमाचा आणि आशीर्वादाचा अनमोल ठेवा दिला.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की, "माता-भगिनींनी भाऊबीजेनिमित्त माझे औक्षण केले आहे. माझ्या तमाम माता-भगिनींच्या आशीर्वादाची कवचकुंडले सदैव माझ्यासोबत आहेत. त्यांच्या या अफाट प्रेमातून, विश्वासातून आणि आशीर्वादातूनच मला समाजासाठी अधिक जोमाने आणि समर्पित भावाने काम करण्याची प्रेरणा मिळते."

या स्नेहपूर्ण आणि आनंदाच्या वातावरणामध्ये मंत्री महोदयांनी सर्व माता-भगिनींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes