कोल्हापूर महानगरपालिका : उघडयावर जैव वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल सीटी डेन्टल ॲन्ड एम्पीलीमेंट सेंटरला 1 लाखाच्या दंडाची नोटीस
schedule18 Mar 25 person by visibility 386 categoryमहानगरपालिका

▪️महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 2012 आणि जैव वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम व पर्यावरण संरक्षण कायदया 1986 मधील तरतुदीनुसार फौजदारी कारवाईचीही नोटीस
कोल्हापूर : क्रांतीसिंह नानापाटील नगर येथील सीटी डेन्टल ऍ़न्ड एम्पीलीमेंट सेंटर हॉस्पिटलने दैनंदिन वापरातुन निर्माण होणारा जैव वैद्यकिय कचरा उघड्यावर टाकल्याबद्दल या हॉस्पिटलला 1 लाख रुपये दंड का करण्यात येऊ नये म्हणून आरोग्य विभागाने आज नोटीस बजावली आहे. सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांना आज सकाळी फिरती दरम्यान डॉ.दयासागर पाटोळे यांच्या सीटी डेन्टल ऍ़न्ड एम्पीलीमेंट सेंटरची सिंरिज व इतर साहित्य रस्त्याकडेला उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे या हॉस्पिटलला नोटीशीद्वारे आपल्या सेंटरमधील दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्याची बेकायदेशीर पध्दतीने विल्हेवाट लावत असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे. सदरची बाब ही अत्यंत गंभीर असून तुम्ही तुमचे सेटरमध्ये जैव वैद्यकीय कचरा अशास्त्रीय पध्दतीने साठा करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विविध नियमांचा व अटींचा तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील विविध तरतुदींचा भंग केलेला असून शहरातील नागरीकांच्या आरोग्यास हानिकारक परिस्थिती निर्माण केलेली आहे.
यामुळे रुग्णालयाची रजिस्ट्रेशन (नोंदणी) रद्द का करु नये. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 2012 आणि जैव वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मधील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई आणि रु.1 लाख रुपये दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांनी बजावली आहे.
याबाबतचा खुलासा तीन दिवसांच्या आत करण्याच्या सूचना देऊन मुदतीत खुलास प्राप्त न झाल्यास आरोग्य विभागामार्फत सीटी डेन्टल ऍ़न्ड एम्पीलीमेंट सेंटर हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नमुद केले आहे.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांनी केली आहे.