SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांच्या पेटंटला मान्यतातपोवन मैदानावर दि. ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजनकाँग्रेसचा नगराध्यक्ष सभागृहात पाठवून हातकणंगलेवर काँग्रेसचा झेंडा फडकवूया : सतेज पाटील विभागीय माहिती कार्यालय - संविधान दिन साजराग्रंथालयांच्या भवितव्याविषयी विद्यापीठात चर्चासत्र यशस्वीडांबरी प्लांट सुरू करण्याच्या हालचालींना वेग; अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यानी प्रकल्पाची केली संयुक्त पाहणीकोल्हापूर भाजपकडून संविधान दिन उत्साहात; राष्ट्रनिर्माणात संविधानाचे महत्व अधोरेखितसमाजातील शेवटच्या घटकाचं हक्क आणि अधिकार अबाधित राखण्याचं काम संविधानाने केले : शीतल धनवडे कोल्हापूर : मतदारांना नाव शोधण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र सुरू‘गोकुळ’मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा; डॉ. कुरियन यांना अभिवादन

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांच्या पेटंटला मान्यता

schedule27 Nov 25 person by visibility 51 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या दोन प्राध्यापकांच्या टू व्हीलर वाहनांच्या तांत्रिक सुविधाविषयीच्या पेटंटला इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस, लंडन (युनायटेड किंग्डम) यांनी मान्यता दिली. 

इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. अनिसअहमद रियाजअहमद नदाफ आणि प्रा. तन्मय प्रसाद कुलकर्णी यांनी ' टू व्हीलर सस्पेन्शन सिस्टीम' मधील ' शॉक अब्सॉर्बरचे' नवीन डिझाईन तयार केले. सध्या वापरात असणाऱ्या शॉक अब्सॉर्बरपेक्षा प्राध्यापकांनी तयार केलेल्या अब्सॉर्बरचे वजन कमी आहे. खराब रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या नव्या संशोधनामुळे तयार होणाऱ्या शॉक अब्सॉर्बरमुळे ही समस्या लक्षणीयरित्या कमी होणार आहे. परिणामी, प्रवाशांचे शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. प्रॉपर्टी ऑफिसमध्ये या पेटंटची नोंदणी झाल्यानंतर विविध परीक्षणे  करण्यात आली. यशस्वी परीक्षणानंतर पेटंटला मान्यता देण्यात आली. या अभिनव संशोधनामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडणार असून अधिक आरामदायी वाहनांची निर्मिती होईल. 

" या संशोधनामध्ये अधिकच्या संधी शोधून त्याद्वारे उत्पादनाच्या स्तरावरील विविध शक्यता आम्ही पाहत आहोत " असे प्रा. नदाफ आणि प्रा. कुलकर्णी यांनी नमूद केले.  प्रत्यक्ष उपयोगात येणाऱ्या आणि अर्थपूर्ण संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या इन्स्टिट्यूटच्या धोरणामुळे विविध विषयांवर संशोधन चालू आहे. 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,  सचिवा प्राचार्या  शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  कौस्तुभ गावडे, व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांचे मौलिक मार्गदर्शन संशोधकांना लाभले. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल इन्स्टिट्यूटचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes