SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधाचा निषेध; मुंबईत भाजपचा विराट जन आक्रोश मोर्चानिवडणूक रणधुमाळी: पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगताबारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता; महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला 'इंडिया स्किल्स ' स्पर्धेमध्ये रौप्यपदकवारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुई येथे पंचगंगा नदीत बुडालेला यड्रावचा तरुण मृतावस्थेत आढळला‘डीकेटीईच्या मेकॅनिकलमधील विद्यार्थ्यांची टेस्ला या जगविख्यात कंपनीमध्ये भक्कम कामगिरी’कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कारदिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन नरके यांचे मार्गदर्शन

जाहिरात

 

नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधाचा निषेध; मुंबईत भाजपचा विराट जन आक्रोश मोर्चा

schedule21 Apr 26 person by visibility 98 categoryराजकीय

मुंबई  : केंद्रातील भाजप सरकारने मांडलेल्या नारी शक्ती वंदन म्हणजेच महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधाच्या निषेधार्थ आज मुंबईत भारतीय जनता पक्षातर्फे भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

 हा मोर्चा वरळीतील ऐतिहासिक जांभोरी मैदान येथून सुरू होऊन वरळी नाक्यापर्यंत म्हणजेच वरळी डोमपर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चात मुंबईभरातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांच्या हक्कांच्या आड येणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.


या जन आक्रोश मोर्चात भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 यामध्ये प्रामुख्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नेते गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अमित साटम आणि चित्रा वाघ यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत अनेक आमदार, खासदार आणि नगरसेवकही उपस्थित होते. वरळी डोम येथे या मोर्चाची सांगता झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले. महिलांना राजकारणात हक्काचे आरक्षण देणाऱ्या विधेयकाला विरोध करून काँग्रेसने आपली महिलाविरोधी मानसिकता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. या मोर्चाच्या माध्यमातून भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन केले असून महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांना धारेवर धरले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes