SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राशिवडे येथे दुध उत्पादक शेतकरऱ्यांच्यावतीने शासनाच्या अध्यादेशाची होळीकरून निषेध दुष्काळी परिस्थितीत पाणी बचतीसाठी खोडवा उसात ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन’ कराकोल्हापूर : दुर्गम भागात दिवाळी साहित्य वितरणसरपंचांनी मांडल्या ग्रामविकासाच्या संकल्पना; दिलेल्या निवेदनाच्या पोहाेच पावतीची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणीडीकेटीई राजवाडयामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- रंग गीताचे .. सूर वेणूचे‘ कार्यक्रमाचे आयोजनदिपावली: प्रकाशाचा आणि आनंदाचा महाउत्सवप्रकाशन विश्वातील प्रयोगशील, मार्गदर्शक दुवा निखळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांना श्रद्धांजलीतारळे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करा; मार्च महिन्यात लोकार्पणाचे नियोजन : पालकमंत्री प्रकाश आबिटकरगोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार!, भगवा चौकात शासनाच्या पुतळ्याचे दहन; सोमवारी २५ हजारांहून अधिक नागरिकांचा भव्य मोर्चा निघणारउदगावच्या कुंजवन जैन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त

जाहिरात

 

राशिवडे येथे दुध उत्पादक शेतकरऱ्यांच्यावतीने शासनाच्या अध्यादेशाची होळीकरून निषेध

schedule08 Nov 26 person by visibility 84 categoryसामाजिक

राशिवडे :   गोकुळ दुध संघाच्या निवडणूकीत बहुमत मिळालेल्या समविचारी आघाडीच्या संचालकांना सता स्थापनेची संधी मिळण्यापूर्वीच राज्य शासनाने नवीन  अध्यादेश काढून  स्वीकृत शासकीय संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या निर्णयाविरोधात राशिवडे येथील  दुध उत्पादक शेतकरी सभासदांच्या वतीने  शासनाच्या अध्यादेशाची होळी करुन महायुती शासनाच्या हुकूमशाही दडपशाही निर्णयाविरोधात तीव्र निषेध करण्यात आला. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे यांनी कोल्हापूरचा स्वाभिमान आणि दुध उत्पादकांची ताकद दाखवून देण्यासाठी तसेच  गोकुळ ब्रॅण्ड वाचविण्यासाठी  सोमवार दि.९ नोव्हेंबर च्या मोर्चात राशिवडे जिल्हा परिषद परिषद मतदार संघातील सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. 

 माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन धुंदरे राशिवडे यांनी  हुकूमशाही मोडीत काढून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारला धडकी भरवणारा मोर्चा काढण्याचा निर्धार केला.  ग्रामपंचायत  उपसरपंच  प्रकाश पोवार यांनी   महायुती शासन गोकुळ दुध संघ बळकविण्यासाठी घाणेरडे  राजकारण करत असल्याचा आरोप केला. 

शेतकरी दूध संस्थेचे चेअरमन  शिवाजी चौगले यांनी  महायुती शासन गोकुळ दुध संघ बळकविण्यासाठी घाणेरडे  राजकारण करत असल्याचा आरोप केला. 
यावेळी  जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे  माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन धुंदरे  उपसरपंच  प्रकाश पोवार  ग्रामपंचायत सदस्य  अजिंक्य गोनुगडे  आनंदराव धुंदरे  सर्जेराव गोंगाणे  माजी  सरपंच  बापूसो गोंगाणे  माजी उपसरपंच आर.डी.चौगले  भारत सेवा संस्थेचे चेअरमन दिनकर शिंदे शेतकरी दूध संस्थेचे चेअरमन  शिवाजी चौगले  ज्ञानदेव चांदणे  सुभाष शिंदे  नंदकुमार नकाते  संतोष बिल्ले  आनंदा सुतार  सागर मगदूम  चंद्रकांत पाटील सुनील बिल्ले  राजेंद्र डकरे धिरज  धुंदरे   रणजित धुंदरे रंगराव गोंगाणे  आदी दुध उत्पादक शेतकरी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes