SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कुलगुरू डॉ डी टी शिर्के याच्या हस्ते राष्ट्रीय क्रॉस कंट्री पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कारविधानसभेची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी; यंत्रणा सज्ज; कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार....विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान : जिल्हाधिकारी अमोल येडगे ; कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी पहा...कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान; राज्यामध्ये उच्चांकी मतदानाची परंपरा कायम; मतदार जनजागृती (SVEEP) उपक्रमांमुळे वाढला टक्काविधानसभा निवडणूक २०२४ : मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ संपन्नकिमान आधारभूत किंमत खरेदी योजना 2024-25 अंतर्गत धान (भात) व रागी (नाचणी) शेतकरी नोंदणीस 15 डिसेंबरपर्यंत मुदतशिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्तमुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ ;१ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शितकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगे

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त

schedule21 Nov 24 person by visibility 73 categoryशैक्षणिक

कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर, दोन्ही देशातील संशोधकांना संशोधनातील नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड यांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठ यांच्यामध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प मंजुर झाला असून त्या अनुषंगाने मिड स्विडन विद्यापीठाचे प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड, संशोधक डॉ.मनिषा फडतारे व रोहन पाटील यांनी प्रकल्पाअंतर्गत पुढील नियोजनासाठी 19 नोव्हेंबर रोजी विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  

याप्रसंगी, दोन्ही विद्यापीठांमधील या महत्वपूर्ण संशोधन प्रकल्पाच्या वाढीसाठी शिवाजी विद्यापीठ सहकार्य करेल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी दिली.  बैठकीस प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, डॉ.सरिता ठकार, आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ.सागर डेळेकर, आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाचे डॉ.शिवाजी सादळे, डॉ.कैलास सोनवणे, डॉ.अनिल घुले, डॉ.चंद्रकांत लंगरे, नॅक विभागाचे डॉ.सुभाष माने आदी उपस्थित होते. युसिक अधिविभागप्रमुख डॉ.ज्योतीप्रकाश यादव यांनी प्रकल्पाचा उद्देश आणि स्वरूप याची माहिती दिली.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes