SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कुलगुरू डॉ डी टी शिर्के याच्या हस्ते राष्ट्रीय क्रॉस कंट्री पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कारविधानसभेची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी; यंत्रणा सज्ज; कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार....विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान : जिल्हाधिकारी अमोल येडगे ; कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी पहा...कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान; राज्यामध्ये उच्चांकी मतदानाची परंपरा कायम; मतदार जनजागृती (SVEEP) उपक्रमांमुळे वाढला टक्काविधानसभा निवडणूक २०२४ : मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ संपन्नकिमान आधारभूत किंमत खरेदी योजना 2024-25 अंतर्गत धान (भात) व रागी (नाचणी) शेतकरी नोंदणीस 15 डिसेंबरपर्यंत मुदतशिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्तमुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ ;१ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शितकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगे

जाहिरात

 

विधानसभा निवडणूक २०२४ : मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ संपन्न

schedule21 Nov 24 person by visibility 110 categoryराज्य

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत मतमोजणी अधिकारी (मोजणी पर्यवेक्षक, मोजणी सहाय्यक व  सूक्ष्म निरीक्षक) कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
 
द्वितीय प्रशिक्षणासाठी जवळपास १ हजार १७४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्यात आली. यावेळी निरीक्षक मीर तारिक अली, राम कुमार पोद्दार, श्री. गगन,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, मनुष्यबळ नोडल अधिकारी राहुल रोकडे, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सूचना  विज्ञान अधिकारी गौरव कवाडे आणि मतमोजणी निरीक्षक VC द्वारे उपस्थित होते. 

गौरव कवाडे यांनी सरमिसळबाबत सादरीकरण केले. मतमोजणी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे  द्वितीय प्रशिक्षण २२ नोव्हेंबरला त्यांच्या नियुक्त मतदारसंघामध्ये घेण्यात येणार आहे. सुमारे १ हजार १७४ मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. EVM मतमोजणीसाठी १७६ मोजणी पर्यवेक्षक, १८६ मोजणी सहाय्यक, १९६ सूक्ष्म निरीक्षक आणि पोस्टल मतपत्रिका मतमोजणीसाठी १५४ मोजणी पर्यवेक्षक, ३०८ मोजणी सहाय्यक, १५४ सूक्ष्म निरीक्षक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes