SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
छत्रपती शाहू वैद्यकीयनगरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी तयार : मंत्री, हसन मुश्रीफपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य "सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ९ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनडी. वाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपद; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धाकोल्हापूर महापालिकेची उद्याने 31 डिसेंबर रोजी रात्रौ 12 वाजेपर्यंत राहणार खुलीप्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनशैक्षणिक धोरण व पायाभूत शिक्षणाची भूमिका आजऱा तालुक्यातील दुर्घटना : परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यूनामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे करवीर नगरीत स्वागतकोल्हापुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती, स्फुर्ती सदन होणार

जाहिरात

 

आ. सतेज पाटील- आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून ऑलिंपिक पदक विजेत्या स्वप्निलला ५ लाखांचे बक्षीस

schedule01 Aug 24 person by visibility 404 categoryक्रीडा

कोल्हापूर : पॅरिस ऑलिंपिकमध्ये कास्यपदक मिळवून कोल्हापूरचे नाव जागतिक पातळी झळकवणाऱ्या स्वप्नील कुसाळे याला आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. स्वप्निलची ही कामगिरी समस्त कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

 पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळे यांने 50 मीटर एअर रायफल ३ पोझिशन या प्रकारात तृतीय स्थान मिळत कास्यपदक जिंकले. स्वप्नीलले मिळवलेल्या या यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा नगरीचा नावलौकिक अधिकच ठळक झाला आहे. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीमधील कांस्य पदक मिळवले होते. त्यानंतर तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलने हे यश मिळवले आहे. हे यश संपूर्ण कोल्हापूरवासीयांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

 स्वप्नील ला 2021 साली 'ब्रँड कोल्हापूर' हा सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. 'ब्रँड कोल्हापूर'च्या या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा खेळाडूंचा गौरव केला जातो. 'ब्रँड कोल्हापूर'ने गौरवलेल्या स्वप्नीलने मिळवलेल्या या यशाचा अभिमान वाटत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes