डॉ. विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम
schedule07 Oct 26 person by visibility 178 categoryसामाजिक
वारणानगर : वारणा विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर यांच्यावतीने आमदार डॉ. विनय कोरे यांच्या ५५व्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले होते. त्याला अनुसरून महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान, वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
एनसीसी व एनएसएस विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एनसीसीच्या छात्रसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ हा संदेश देत ९०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. एनसीसीच्या छात्रसैनिकांनी शिबिराचे नियोजन, रक्तदात्यांना मार्गदर्शन, स्वयंसेवकांमध्ये समन्वय आणि जनजागृतीची जबाबदारी पार पाडली.
या शिबिरासाठी महात्मा गांधी रक्तपेढी, पारगाव यांचे सहकार्य लाभले. गजानन बुट्टेवाडकर, प्रमोद मंगसुळे व त्यांच्या टीमने रक्तसंकलनाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली.
कार्यक्रमासाठी वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, डॉ. कल्पना पाटील, डॉ. एस. एम. पिसे, रजिस्ट्रार डॉ. आर.बी.पाटील, डॉ. डी. आर. ढेडे, डॉ. अमोल शेरेकर, प्रा. पी. आर. पाटील, कर्नल (निवृत्त) आर. बी. पाटील, प्रो. ऐनापुरे, विभागप्रमुख, अधिष्ठाता, एनसीसी अधिकारी, छात्रसैनिक व एनएसएस विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट रणजीत नाईक, एनएसएस विभागाचे प्रमुख प्रीतीश पाटील व ऋषिकेश जाधव यांनी परिश्रम घेतले.