विभागीय क्रीडा संकुल येथे मैदानी खेळाच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्राची सुरुवात; खेळाडूंनी मैदानी खेळांच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
schedule26 Nov 24 person by visibility 470 categoryक्रीडा

कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर येथे मैदानी (Athletics) खेळाच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
सर्व खेळाडू, संस्था, क्रीडा मंडळे, शाळेतील, महाविद्यालयातील खेळाडूंनी धावणे, लांबउडी, उंचउडी, गोळा, थाळी, भाला, हातोडा फेक इत्यादी मैदानी खेळांच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.
खेळाडूंनी नाव नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील यांच्याकडे करावी.