तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजला व्हेरी गुड श्रेणी प्राप्त
schedule07 Jul 25 person by visibility 332 categoryशैक्षणिक

वारणानगर : येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेज मधील सर्व विभागांना (सिव्हील, मेकँनिकल, कॉम्पुटर सायन्स, व इलेक्ट्रिकल ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्याकडून व्हेरी गुड श्रेणी प्राप्त झाली. हा शेरा संस्थेच्या शैक्षणिक दर्जाची साक्ष देतो.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या बाह्य निरीक्षण समितीने संस्थेतील शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक पायाभूत सुविधा , शिक्षकांचे योगदान तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविणेत येणाऱ्या प्लेसमेंट या बाबतीत संस्थेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे निरीक्षण नमूद केले . परिणामी कॉलेजला व्हेरी गुड श्रेणी प्राप्त झाली अशी माहिती प्राचार्य पी. आर . पाटील यांनी दिली.
वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही व्ही कार्जीनी यांनी प्राचार्य पी. आर . पाटील, मार्गदर्शक डॉ. पी. एम. पाटील , अकॅडेमिक कॉर्डीनेटर प्रा. डी . आर. माने , सर्व विभाग प्रमुख प्रा. व्ही. एस. परीट , प्रा. एस. एस. गुरव , प्रा. पी. व्ही. चव्हाण , प्रा. एस. जे. संकपाळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.